गाडगे महाराज पुण्यतिथी व स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा संपन्न

दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे गाडगे महाराज पुण्यतिथी व स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन मा.सुनीलभाऊ वरारकर,माजी सभापती, पंचायत समिती वणी यांचे हस्ते संपन्न झाले, कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती मा.भुपेन्द्रसिंग पाल, जिल्हा प्रतिनिधी,कोरोमंडल कंपनी, ज्यांनी विद्यालयासाठी सात लाख रुपये निधी दिला, कार्यक्रमाचे अध्यक्ष रविभाऊ एंबडवार, प्रमुख पाहुणे कु.मेघना गुडंकवार, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, सामाजिक वनीकरण विभाग, भैय्यासाहेब माडेवार ,माजी प्राचार्य अभिमन्यू सामृतवार व प्राचार्य राजेश शर्मा व गावातील प्रतिष्ठित नागरिक गणेशभाऊ एबंडवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात द्विपपज्वलाने झाली, प्रत्येक वक्त्यांनी गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय नरडवार व आभारप्रदर्शन प्रभाकर लाकडे यांनी केले,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम घेतले, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.