
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल शेतकरी भारती इंगोले यांच्या शेतात तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांनी भेट देऊन शेतातील कपाशीवर मर रोगांची पाहणी केली. सविस्तर वृत्त असे १५ सप्टेंबर रोजी कपाशी वर मर रोगांची लागण कृषी विभागाचे दुर्लक्ष अशी बातमी मध्ये प्रकाशित करण्यात आली होती या बातमीची दखल घेत राळेगाव तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष दर्शनी मोक्का पाहणी करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की रिधोरा परिसरात कपाशीवर मर रोगाची लागणं झाली आहे तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना फोन वरून असे उत्तर दिले की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोक्का पाहणी केली आहे. पण हे सगळे खोटे सांगितले आहे असे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले आहे. कृषी अधिकारी यांनी फक्त काळे फार्मसीस येथे भेट दिली परंतु त्यांनी कोणाच्याही बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन किंवा भेट दिली नाही असेही सांगितले जात आहे. सदर राळेगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालू असुन १८ सप्टेंबर रोजी मतदान झाले आहेत या संपूर्ण मतदान केंद्रावर भेटी देऊन वेळात वेळ काढून राळेगाव तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांनी रिधोरा येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोक्का पाहणी केली आहे.सदर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोक्का पाहणी केली असल्याने येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचे आभार मानले आहे. परंतु कृषी विभागाचे अधिकारी शेतावर तर सोडा रोडच्या खाली सुध्दा उतरायला तयार नाही या वरुन असे लक्षात येते की कृषी विभागांना शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही.
