
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ: दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी ओळखले जाणारे विनोद पत्रे यांचा त्यांच्या मायभूमीत, यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. श्री संताजी जगनाडे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यवतमाळ, विदर्भ तेली समाज महासंघ जि. यवतमाळ, अखिल तेली समाज महासंघ, नवी दिल्ली आणि संताजी सृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) संपर्क प्रमुख संतोष ढवळे, समृद्धी महामार्गाचे अभियंता
समाज महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष सुनिता विलास काळे आणि जिल्हाध्यक्ष अनिल जिपकाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि संताजी महाराजांच्या मूर्तीचे स्मृतिचिन्ह देऊन विनोद पत्रे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना विनोद पत्रे यांनी, “आयुष्यात अनेक सत्कार झाले असले तरी, मायभूमीत आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. हा सन्मान पुढील कार्यासाठी प्रेरणा देईल,” असे सांगितले. त्यांनी ज्ञानेश्वरी रायमल तथा विलासजी काळे यांचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव, पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
