ढाणकीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला कायमस्वरूपी डॉक्टर दया– शेतकऱ्यांची मागणी

ढाणकी,प्रतिनिधी प्रवीण जोशी.


गुरांना होणाऱ्या लंम्पि आजाराने पशुपालक शेतकरी यांची चिंता वाढली आहे ढाणकी येथे कायमस्वरूपी पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहत नसल्याने गुरांचे पालन करावे की गुरांच्या आजाराकडे लक्ष द्यावे ही चिंता शेतकऱ्यांना सतावत असून ढाणकी येथील पशु वैद्यकीय दवाखान्याला कायमस्वरूपी डॉक्टर देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
ढाणकी गावाला तसेच येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला आजूबाजूची बहुतांश खेडी मोठ्या प्रमाणात जोडल्या गेली असून या परिसरात गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सध्या गुरांना विविध आजाराची लागण झाल्याचे पहावयास मिळत असून ढाणकी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मोठ्या प्रमाणात पशुपालक आपल्या गुरांना उपचारासाठी घेऊन येतात परंतु इथे कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने अनेक पशुपालकांना उपचारासाठी डॉक्टरांची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे तसेच कधी कधी उपचाराअभावी परत जावे लागत आहे डॉक्टर कुठे गेले अशी दवाखान्यात चौकशी केली असता डॉक्टर लसीकरणासाठी बाहेर गेले अशी उत्तरे उपस्थिता कडून ऐकावयास मिळत असल्याने गुरावर वेळेत उपचार व्हावा यासाठी येथील शेतकरी संजय जिल्हावार भारत तुपेकर रविशंकर जमदडे धनंजय तगडपल्लेवार या शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना निवेदन सादर करून ढाणकी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.