
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दुसऱ्या लाॅकडाऊन नंतर मागील आठवड्यापासून शाळा शिक्षण विभागाने सुरु केल्या आहे.पण विद्यार्थी,विद्यार्थीनी येत नसल्यामुळे म्हणा की शासकीय निर्देशानुसार की पालकाची मानसिकता आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची नसल्याने शाळा सलग दोन वर्ष विद्यार्थीविनाच सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.
शाळा म्हटली की विद्यार्थी,विद्यार्थीनी चा किलबिलाट, उत्साहाचे वातावरण दिसतं च नाही. दहावी चा निकाल जाहीर झाल्यानंतर जवळ जवळ सर्व उत्तिर्ण,गुण देखील डोळे पांढरे व्हायचे च राहिले. परिक्षा विना भरपूर गुण मिळाले,हा नविन अनुभव रात्र रात्र जागून अभ्यास करणाऱ्यां मागील पिढीसह या पिढीने अनुभवला.
इयत्ता पहिली ते नववी पर्यंत ना परिक्षा,ना अभ्यास सर्व भरघोस गुणांनी सलग दोन वर्ष उत्तिर्ण.दोन वर्षे अभ्यास नाही मग पुढील वर्गाची तयारी करण्यासाठी किती परिश्रम विद्यार्थी, विद्यार्थीनी सह शिक्षकांना घ्या वे लागेल याची कल्पना च पालकांसाठी चिंताजनक आहे.
या दोन वर्षात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ऑनलाईन शिक्षण प्रणाली बघावयास मिळाली,पण रेंज नाही?काय शिकवलं हे कळलं नाही तरी मात्र पालकांना फी साठी त्रास सहन करावा लागला. बहुतांश पालकाची कमाई बंद झाल्याने त्यांच्यासमोर मराठी माध्यमाच्या शाळेत शिकविण्याशिवाय पर्याय च नाही. पण आमच्या शाळेची फी भरावी च लागेल त्या शिवाय टी.सी.मिळणार नाही असा मुजोर उर्मटपणा अनेक पालकांनी अनुभवला.
या साठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने फी साठी आग्रह धरु नये,टी.सी. द्या वी असे आदेश निर्गमित केले आहे पण पालक आणि संस्था चालक यांच्यात “तू तू मैं मैं” होत असून चार ते पाच तक्रारी सध्या या संदर्भात झाल्या चे कळते.
ऑनलाईन शिक्षण प्रणाली दहावी बारावी साठी योग्य पण पहिली ते नववी पर्यंत काही च कामाची नसल्याचे स्पष्ट मत अनेक पालकांनी बोलून दाखवलं.फक्त फी साठी नाहक त्रास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांना मिळत आहे हे विशेष…
