
प्रतिनिधी( प्रवीण जोशी) ढाणकी
सध्या आपण बघतोच आहे रस्त्याचे बांधकाम महाराष्ट्रभर चालू आहे ही चांगली बाब म्हणावी लागेल पण काम करणा रा ठेकेदार मात्र अत्यंत संत गतीने काम करत असल्यामुळे अपघात होत असून कित्येकाचा बळी गेला. अनेक तरुण यामध्ये बळी पडले अनेकांचे संसार उध्वस्त झाले मग संत गतीने काम होत असल्यामुळे संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये असे शिवसेनेचे मीडिया विभागाचे गजानन आजेगावकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. आत्तापर्यंत अनुभव पाहता दरवर्षी कोट्यावधी रुपयाचा खर्च रस्त्याच्या कामावर करून सुद्धा खड्डे मुक्त महाराष्ट्राची निर्मिती का होत नाही. हे एक न सुटणारे कोडे आहे अशातच दिवसेंदिवस वाहण्याची संख्या वाढत आहे आणि रस्त्यावर काम संथगतीने चालू असल्यामुळे अपघाताची संख्या वाढत असून त्यात अनेक लोकांचा नाहक बळी जात आहे. तर काही जणांना आयुष्यभर अपंगत्व स्वीकारावे लागत आहे हे नाकारून चालणार नाही रोजच वृत्तपत्रात एक तरी रस्ते अपघाताची बातमी वाचावयास ऐकावयास मिळत आहे. आजची परिस्थिती पाहता देशातल्या होणाऱ्या अपघाताची संख्या पाहता 14% अपघात हे महाराष्ट्रातील रस्त्यावर होत आहे. मग याला अतिशय संथ गतीने काम करणारे ठेकेदार जबाबदार नाहीत का ? असा प्रश्न शिवसेनेचे मीडिया प्रमुख गजानन आजेगावकर यांना पडतो आहे.
