अनुसूचित मुलींची शासकीय निवासी शाळा महागाव च्या विद्यार्थिनींनी मारली बाजी,शाळेचा शंभर टक्के निकाल

महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

आज दि. २ जून २०२३ रोजी नुकताच वर्ग १० वी चा निकाल जाहीर झाला असून मागील सतत ९ वर्षापासून इ.१० वी च्या १००% निकालाची परंपरा अनुसूचित मुलीची शासकीय निवासी शाळा महागावच्या विद्यार्थिनींनी कायम राखत या ही वर्षी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. कु. दीक्षा नरवाडे ९४.६०%
गुण घेऊन शाळेतुन प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर कु. संजना गजभार ९३ . % द्वितीय व कु. गायञी ढोले ९१ . ४० % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला. तर , कु.पुजा मस्के ९० . २०% गुण घेऊन चौथा क्रमांक गुण मिळविले असून उर्वरित विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थिनीच शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले विशेष बाब म्हणजे शाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असून त्यांना कुठल्याही खासगी शिकवणी वर्ग नसताना सुद्धा विद्यार्थिनींनी अप्रतिम घवघवीत यश मिळवले..
सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे त्याच्या उज्वल भविष्यासाठी निवासी शाळेची मुख्याध्यापिका मंगला भोयर , साबळे सर राऊत सर भगत मँडम किनगावकर मँडम व सर्व शिक्षकांनी यांनी शुभेच्छा दिल्या.