
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात २७/११/२०२३
पासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील वेचणी साठी आलेला कापुस, ऐन बहार लागुन शेंगा लागण्याच्या हंगामात तुर खचून पडली. त्याच बरोबर मिरची, हरबरा, गहु, भाजीपाला पिकांसह फळबागांची प्रचंड नासाडी झाली. या बाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना तहसीलदार राळेगाव यांचे मार्फत मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता संकटाच्या खाईत सापडला असुन शासनाने आज त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन बळ देण्याची गरज आहे.
त्यामुळे पिकांची झालेली नुकसान पाहता नुकसान पिक विमा तत्काळ मंजुर करण्यात यावा तसेच शेतातील झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी. अशी आग्रही मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली. यावेळी तालुका उपाध्यक्ष सुरज लेनगुरे, सरचिटणीस रोशन गुरूनुले, ओम आडे, प्रविण ओंकार, सचिन आत्राम, विठ्ठल शेंडे, अमित मोहुर्ले, गोपाल मांडाडे, गणेश मोहुर्ले, सागर मोहुर्ले, ओम नेहारे, अजय फुटाणे, रुपेश मडावी, खुशाल राऊत, विवेक ढवस, शेखर कवडे, रविन्द्र क्षीरसागर, सह महाराष्ट्र सैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.
