


गणपती मिरवणुकीत नाचताना धक्का बुक्की झाल्याने मनात राग धरून साई मंगल कार्यालय वरोरा च्या चौकात गाठून भांडण विकोपाला जात धारदार चाकूने हल्ला केल्याने युवक जागेवरच पडला . उपचारासाठी दाखल करण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.या प्रकरणी आरोपी ला अटक करण्यात आली आहे .पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
हनुमान वॉर्ड येथील अमोल नवघरे व नितीन चूटे यांच्या केसरीनंदन गणेश मंडळ येथे शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला.त्याच गोष्टीचा राग मनात धरत अमोल नवघरे याने नितीन चूटे यांच्यावर चाकूने सपासप वार केले .हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीन चूटे याला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला .
आरोपी अमोल नवघरे याला अटक झाली असून पुढील तपास वरोरा येथील ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक भस्मे ,पो. का. सोनोने नवघरे ,नागोसे यांच्या पथकाने पार पाडली.
