
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोणा (बाजार) येथे गुरुदेव सेवा मंडळ वाढोणा (बाजार) व तसेच समस्त गावकरी यांचे सहकार्याने संतगाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त दिनांक २२फेब्रुवारी ते २३फेब्रुवारी या दोन दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ५६ वा पुण्यतिथी साजरी करण्यात आली, पहिल्या दिवशी ध्यान प्रार्थना आणि रामधून काढून रात्री ह. भ.प.प्रमोद महाराज देशमुख यांचे कीर्तन होते, कीर्तन करत असताना त्यांच्या सबोत तबला वादक पवन महाराज दडांजे सावनेर , व हार्मोनियम वादक भारत महाराज मेश्राम आठमुर्डी, आणि उत्कृष्ट गायक नरेश महाराज पिंपळगाव, व सह गायक पांडुरंग उइके महाराज वाढोणा (बाजार) हे हजर होते. वदुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील वारकरी दिंडी स्पर्धेचे आयोजन करून गावातून पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली यावेळी यवतमाळ जिल्हा गुरुदेव प्रचारक मा श्री शेरअली बापू लालानी यांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्व काय आहे या बद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तसेच नवीन मानवता मंदिर चे रिबीन कापून लोकार्पण करण्यात आले, दोन दिवस वाढोणा नगरी मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावकऱ्यांचे गुरुदेव सेवा मंडळ वाढोणा बाजार यांनी आभार मानले.
