
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताहाचे अंतर्गत दिनांक २३.९.२०२२ रोजी स्व. रामदासजी जवादे सभागृह किन्ही जवादे येथे महसूल विभागाचे वतीने सकाळी १०.३० वाजता राजस्व सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या सेवा शिबिरात महसूल विभागाशी संबंधित , फेरफार नोंद, वारस नोंद, पी.एम. किसान सन्मान योजना, पांदन रस्ता,शेताचे रस्ते,ई पिक नोंदणी, निराधार योजना, श्रावणबाळ योजना,या संदर्भातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले व तात्काळ समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मा.उपविभागीय अधिकारी शैलेश काळे,नायब तहसीलदार दिलीप बदकी , सरपंच सुधीरभाऊ जवादे, सरपंच कवडुजी कुळसंगे (ऐकुर्ली ,खैरगांव जवादे), मंडळ अधिकारी महादेव सानप, तलाठी सौरभ चांदेकर, निलेश देवळे,संजय डुकरे, हेमंत सातंगे, पोलीस पाटील अनुराग जवादे,कोतवाल रवि ठाकरे,युवा शेतकरी प्रणय वाढई ,नरेश ठाकरे व परीसरातील शेतकरी हजर होते.सदर शिबीरात किन्ही ज. मंडळातील नागरीकांचे महसूल विभागाशी संबंधित सेवा संबंधी समाधान करण्यात आले
