जागजई येथील आदिवासी समाजाची काशी विकासापासून वंचित,आदिवासी समाज सरकारवर नाराज

सहसंपादक-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील जागजई येथे बुद्ध पौर्णिमेला संपूर्ण विदर्भातून आदिवासी समाजाचे गोंडी देवासोबत भक्त आंधोळी करीता येत असतात जवळपास पंनास हजार भाविक उपस्थित असतात . जागजई गावात जत्रेचे स्वरूप निर्माण होत असते त्याच अनुसंघाने प्रशासनाने जागजई येथे पंचधारा येथे रस्ता सोईस्कर करावा , स्त्रियांना कपडे बदलविण्याकरीता व शौच्यालय बनविण्यात यावे , भाविक भक्त मंडळी करीता आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात यावी .मुलभुत सोई उपलब्ध प्रशासनाने करून द्याव्या अशी मागणी दरवर्षी आदिवासीं बांधव करत असतो परंतु याकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे राळेगाव हा आदिवासी मतदार संघ आहे याठिकाणी आमदार हे आदिवासी समाजाचे असुनही जागजई येथे असलेल्या आदिवासीं बांधवांच्या काशीचा विकास मात्र करू शकले नाही हे विशेष त्यामुळे आता तरी पुढील काळात विकास करावा अशी मागणी आदिवासीं बांधव व संत झेबुजी महाराज देवस्थान कमिटीचा वतीने करण्यात येत आहे.