पांढरकवडा प्रकल्प कार्यालयात प्रकल्पस्तरीय समितीची स्थापना करा जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांची मागणी

तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

पांढरकवडा येथील प्रकल्प कार्यालयात प्रकल्पस्तरीय समितीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी ट्रायबल लोणचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी आदिवासी विकास मंत्री अँड.के सी पाडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे,नाशिक, अमरावती, नागपूर येथे चार अपर आयुक्त कार्यालये आहेत. या अपर आयुक्त कार्यालयांतर्गत आदिवासी जिल्ह्यांमध्ये ३० प्रकल्प कार्यालये कार्यरत आहेत.या ३० आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील ,आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजना/कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी ३ नोव्हेंबर २०२१ रोजी फक्त १९ प्रकल्पस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.या समित्यांवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे.
परंतू अद्यापर्यंत पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्पस्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली नाही. आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजनांची आदिवासी बहुल क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पांढरकवडा येथे लवकरात लवकर प्रकल्पस्तरीय समितीची स्थापना एकदा अशी मागणी ट्रायबल फोरमचे जिल्ह्याउपाध्यक्ष अंकित नैताम यांनी निवेदनाद्वारे राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पडवी तसेच सचिव आदिवासी विकास विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.