
राळेगाव तालुक्यातील विहिरगांव येथे गावलगत लागून असलेल्या कपिल वगारहांडे याच्या शेतात अजगर जातीचा सात ते आठ फुट साप त्यांना आढळून आला त्यांनी गावातील सर्प मित्र धीरज येरकाडे यांना तात्काळ माहिती देऊन अजगर जातीच्या सापाला पकडून जीवदान देण्यात आले आणि त्याची चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली
सर्पमित्रांन मोठ्या शिताफीने संधीचं सोनं करून कोणालाही ईजा पोहोचायच्या अगोदर या अजगर जातीच्या सापाला पकडून गावकऱ्यांना दिलासा दिला. कदाचित हा साप
शेतातुन गावाकडे आगेकूच केली असती तर गावातील लोकांच्या जनावरांना म्हणा गावामध्ये जिवित हानी व्हायला वेळ लागला नसता.अशातच गावातील या तरूणांनी या अजगर जातीच्या सापाला पकडून त्याच्या सुरक्षित ठिकाणी सोडून गावकऱ्यांना दिलासा दिला यामुळे गावकऱ्यांनी सर्पमित्र,धीरज येरकाडे तसेच गावातील तरुण समीर राऊत,लक्ष्मन चामलाटे मयूर मूर्खे विजय राऊत किशोर चामलाटे तेजश चामलाटे राहुल सुतार कपिल वगारहांडे सोबतच (पत्रकार) रजत चांदेकर इत्यादी तरूणांचे अभिनंदन केले आहे.
