मार्कंडेय पब्लिक स्कूल येथील खेळाडूंनी जिल्हास्तर तलवारबाजी स्पर्धा जिंकून तब्बल ११ खेळाडूंनी घेतली विभाग स्तरावर भरारी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२३ रोजी नेहरू स्टेडियम जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून विविध शाळेने सहभाग नोंदविला होता त्यामध्ये राळेगाव तालुक्यातील मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव या शाळेमधील १९ खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामधील ११ खेळाडू जिल्ह्यामध्ये अव्वल क्रमांकावर आले आहे यामध्ये १४ वर्षातील मुले इव्हेंट (Epee) या खेळ प्रकारामध्ये साई तेलंगे, यश सावरकर, पुष्पक राऊत १७ वर्षातील वयोगटांमध्ये (मुली/Epee) वंशिका देशमुख, श्रावणी वाघ, जागृती डायरे १७ वर्षातील (मुले/sayber,Epee,Foil) खेळ प्रकारामध्ये सुजल घनमोडे, जयेश नगराळे, अर्पित दरणे, चेतन कानारकर तसेच १९ वर्षातील मुलींमध्ये (saber/Epee) या खेळ प्रकारामध्ये वर्ग बारावी मधील कुमारी अवंतिका बनसोड या सर्व खेळाडूंचे दिनांक १० ऑक्टोंबर २०२३ जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे होत असलेल्या शालेय विभागीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धे करिता सर्व खेळाडूंचे निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंच्या यशाचे श्रेय ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. संतोष कोकुलवार, मार्कंडेय पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. शितल बल्लेवार, व्यवस्थापक श्री साईनाथ बल्लेवार, शारीरिक शिक्षक श्री विकास शेळके, तलवारबाजी प्रशिक्षक श्री आकाश मेटकर तसेच सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग यांना देण्यात येते.