विजेच्या धक्क्याने पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू
राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील घटना

सहसंपादक : रामभाऊ भोयर

वालाच्या शेंगा तोडण्याकरिता गेले असता घरावरील टीनाला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागला असता एका 50 वर्षे इसमाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना 5 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजे दरम्यान राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथे घडली.

श्रावण मारुती मोहूर्ले (५०) रा. कीन्ही जवादे असे विजेचा धक्का लागून मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. मृतक श्रावण हे रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचे.

दरम्यान 5 फेब्रुवारी रोजी दुपारी स्वतःच्याच घरी लागलेल्या वालाच्या शेंगा तोडण्याकरिता श्रावण हे गेले असता त्यांच्या घरावरून गेलेला सर्विस केबल घरावरील टीनेला स्पर्श करून गेला होता.यापासून श्रावण हे मात्र अनभिज्ञ होते. शेंगा तोडणी सुरू असतानाच श्रावण यांचा स्पर्श टीनेला झाला व यातच ते इहलोकी गेले. मृत्यूच्या परिवाराला शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी परिवाराच्या लोकांकडून करण्यात आली तसेच मृत्यूच्या पश्चातापद त्यांच्या मागे, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी आहे

सदर घटनेचा तपास वडकी पोलीस करीत आहे