
चक्क जिल्हा परिषद शाळेजवळ केली जाते दारू विक्री
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंजी येथे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दारू विक्री सुरू होती गावातील बचत गट तसेच ग्रामपंचायत मध्ये दारुबंदी चा ठराव मंजूर तो राळेगाव पोलिस ठाण्यात दिंला असता त्या गावातील दारू बंद करन्यात आली होती तेव्हापासून त्या गावात वाद विवाद , भांडन तंटे, बंद झाले होते व गावातील वातावरण सुद्धा चांगले होते पण गेल्या दोन वर्षांपासून या गावात चार ते पाच दारुविक्रेते जन्माला आले आणी त्यांनी गावाचा सत्यानाश केला व रोज आमच्या गावात भांडण तंटे दररोज पहायला मिळत आहे हे मात्र विशेष. गावात दारु मिळत असल्याने आमचे अल्पवयीन मुल सुद्धा या व्यसनाच्या आहारी गेले. रात्रीच्या वेळी काही कामानिमित्त बाहेर निघने सुद्धा महिलांना कठीण झाले आहे. गावातील काही प्रतीष्ठीत नागरिकांनी दारु विक्रेते यांना दारु विक्री बंद करा असे समज दिंले असता ते ऐकाला तयार नाही आहे एवढी मुजोरी यांची वाढली आहे. विशेष म्हणजे आंजी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ चक्क दारू विक्री केल्या जात आहे. याचा त्रास भविष्यात शाळकरी विद्यार्थी सुद्धा यांच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सदर दारु विक्रेते यांच्यावर राळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी लक्ष देऊन आमच्या गावातील दारू बंद करन्यात यावी अशी मागणी आंजी येथील महिलांनी केली आहे.
सध्या आमच्याकडे पोलिस कर्मचारी कमी असल्याने तेवढे लक्ष देने शक्य नाही आहे. तरी पण एकदोन दिवसांत आम्ही एक दोन कर्मचारी पाठवून कारवाई करू
ठाणेदार राळेगाव
संजय चोबे
