
प्रतिनिधी शेख रमजान
ढाणकी येथील एका घरात स्टाईल फरशी काम करणाऱ्या मजुराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची 12 जूनला घटना घडली आहे. विजयसिंग गौर (26) असे या मजुराचे नाव असून याप्रकरणी बिटरगाव पोलिस ठाण्यात त्याच्या वडिलानी घातपाताचा संशय व्यक्त करुन चौकशीची मागणी केली आहे .
ढाणकी येथे घराचे स्टाईल फरशीचे काम करताना विजयसिंग गौर याला विजेचा धक्का लागल्याने त्याला ढाणकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टर ने त्यास मृतक घोषित केले .त्यानंतर मृतकाचा शवविच्छेदन ढाणकी येथे करू न देता मृतकाच्या जवळच्यानी शवविच्छेदन करण्यासाठी उमरखेड येथे नेले .
