ढाणकी शहराची पाणी समस्या कधी सुटणार? ढिसाळ नियोजनामुळेच ढाणकीवासी त्रस्त


प्रतिनिधी प्रवीण जोशी
ढाणकी


ढाणकी शहर पाणी समस्येसाठी अख्या पंच कोशीत प्रसिद्ध आहे तिन्ही ऋतूतील कोणताही महिना असो पाणी नळाला कधीच वेळेवर येणार नाही एवढे नक्की मग नोव्हेंबर एप्रिल ऑगस्ट महिना येथील पाणी समस्या ही एक जटिल आणि किचकट बाब म्हणावी लागेल निवडणूक आली म्हणजे ढाणकीकराना पाणी प्रश्न सोडवू असे भावनिक आव्हान केले की जनता त्या पक्षाला मतदान करत असते पण समस्या मात्र कायम जो आला तो सतेत रमला आणि शेवटी पाणी प्रश्न न सोडवता तो तसाच पुढील निवडणुकीसाठी अर्धवट ठेवून निघून गेला. असे राजकीय चित्र बघावयास मिळाले जनतेला अशुद्ध असलेले किंवा दररोज वापरण्यासाठी असलेले पाणी सुद्धा 20 दिवस मिळत नाही तर जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी गावातील जनतेला मिळेल का. हा मोठा गहन प्रश्न आहे गावकऱ्यांना पडतो आहे फ्लोराईडयुक्त व अशुद्ध पाण्यामुळे अधिकाधिक आजार बळावतात गावातील अनेक प्रभागात अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे अनेकांना मुतखडा या आजाराने ग्रासलेले आहे खासगी पाणी विकणाऱ्याचे उपकारच म्हणावे लागेल की त्यांनी 150 रुपयात 500लिटर पाणी विकत तरी देतात अन्यथा घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागली असती नैसर्गिक स्वरूपात जर पाणी टंचाई झाली असती तर जनतेने समजून घेतले असते व पुढाऱ्यांनी सुधा तितक्याच लगबगीने पाणी टंचाई ही नैसर्गिक आहे दाखविण्याचे काम केले असते हे विशेष बाब.
गावातील बहुतांश भाग हा रोजमजुरी करून आपला उदर निर्वाह करतो सकाळी कामाला गेल्यानंतर काम आटोपून हंडाभर पाण्यासाठी जर फिरावे लागत असेल तर त्या कामगार महिलेची किती कुचंबणा होत असेल ग्रामपचायत रूपांतर हे नगरपंचायत मधे झाले पण पाणी समस्या मात्र सुटली नाही उलट ती वाढतच गेली तसेच अकृषक नवीन प्लॉट जिथं आहेत अशा लोकांच्या पाणी प्रश्न यापेक्षा गंभीर आहे प्रत्यकेजन आपल्या घरी बोअरवेल किंवा विहीर खोदू शकत नाही त्यांच्या या प्रश्ना कडे नगरपंचायत कधी लक्ष देणार हा सवाल सर्वसामान्य जनतेला पडतो आहे तसेच कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे पाहिजे असल्यास नगरपंचायत मधे जावे लागते त्यावेळेस मात्र अकृषक नवीन भूखंड असलेल्या लोकांना मात्र करभरणा हा पूर्ण करावा लागतो जितक्या प्रकारच्या आणि जितके दिवस सुविधा दिल्या तितकाच कर हे धोरण अवलंबले तर ते नगर पंचायतला चालेल का. काही दिवसपूर्वीच नगरपंचायतीच्या काही प्रभागातील पोट निवडणुका आटोपल्या त्या वेळेस सतेचा मुकुट आणि सतेच्या सारी पाठासाठी तालुक्याची व जील्हाचे नेते गावात ठाण मांडून बसले होते आणि आपल्या मतदाराच्या एक ना एक घर शोधून काढले पण त्या मतदात्याला पाणी मिळत नसताना नेत्यांनी कधी त्यांची विचारपूस केली किंव्हा समस्या जाणून घेताना कोणी दिसले नाही मग पोटनिवडणुकीच्या वेळेस राजकीय फौज फाटा होता व त्यावेळी फिरणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे हा प्रश्न पडतो आहे.
तसेच आजही गावाला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा ही जुनीच असून त्याच जीव नसलेल्या यंत्रणेवरच गावचा पाण्याचा डोलारा आहे त्यात कुठेही सुधारणा होताना दिसत नाही तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या फुलसावंगी रोडवरील विहिरीला भरपूर पाणी आहे शिवाय सुरळीत पणेविद्युत प्रवाह होईल अशी व्यवस्था आहे असे असताना गावकऱ्यांना पाणी समशेला सामोरे जावे लागत आहे तेव्हा पाणी समस्या ही ढिसाळ नियोजनामुळेच होत की काय अशी चर्चा गावकरी करीत आहेत.