राळेगांव येथे आरोग्य शिबिर संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

कृष्णजन्म अष्टमीचे औचित्य साधुन दि 7/9/2023 रोज गुरूवारला सकाळी 10 ते 3 वा .ग्रामीण विकास प्रकल्प माता नगर रालेगांव येथे महात्मा गांधी आयुर्वेदिक रुग्णालय ,सालोड ( हिरापूर) वर्धा ,”माणुसकीची भिंत “व “ग्रामीण विकास प्रकल्प राळेगाव “जिल्हा यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर डॉ देवयानी दासर ,डॉ तृप्ती ठाकरे ,डॉ श्यामली हिवरे ,डॉ पियुष पारधेकर ,डॉ नवीन खत्री डॉ रुपेश सुलताने ,भाग्यश्री ठाकरे, चंदाबाई बावणे, निलेश बुरबुरे,विशेष अतिथी सागर विटाळकर प्रकल्प विस्तार अधिकारी राळेगाव हरिभक्त परायण राजूभाऊ विरेदंडे घाटंजी यांचे उपस्थितीत संपन्न . सर्वप्रथम प्रतिमेची पूजन ,माला अर्पण करून शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे शुभहस्ते संपन्न. या प्रसंगी उद्घाटनाचे प्रास्ताविक श्री भूपेंद्रजी कारिया यांनी केले, डॉक्टर देवयानी दासर व सागर विटाळकर यांनी मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन मधुकरराव गेडाम व सूत्रसंचालन गंगाधर घोटेकार यांनी केले. उद्घाटनानंतर आरोग्य शिबिराला प्रारंभ झाला. आरोग्य शिबिर स्थळी पी डी मेंडुलकर रालेगांव व प्रसादजी भोगले , दारव्हा यांनी मानुसकी ची भींत या उपक्रमास विविध कपडे भेट दिले . शिबिरामध्ये बहुसंख्येने नागरिकांनी सहभाग घेतला .विशेष सूर्योदय कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. त्यानंतर डॉक्टर देवयानी दासर यांचे नेतृत्वाखाली सर्व चमुनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या माणुसकीची भिंत कार्यालयाला भेट दिली .कार्यक्रम यशस्वीते करिता भूपेंद्र कारिया मेघेश्याम चांदे .मधुकरराव गेडाम, यूसुफअली सय्यद, गंगाधर घोटेकर ,गजानन डाखोरे नंदूभाऊ टिपणवार ,रामकृष्ण कारमोरे, वाल्मीक मेश्राम, पी डी मेंडुलकर ,गिरीधर ससनकर, निखिल राऊत ,घनश्याम कारिया, पवन वर्मा, वासुदेव तोटे ,यांनी विशेष परिश्रम घेतले.