स्वच्छता अभियान समिती व क्रांतिकारी शहीद भगतसिंग युवा संघटन यांच्या संयुक्त नियोजनातून स्व. राजीव गांधी क्रिडा संकुल राळेगाव येथे स्वच्छता अभियान

स्वच्छता अभियान समिती व क्रांतिकारी शहीद भगतसिंग युवा संघटन यांच्या संयुक्त नियोजनातून स्व. राजीव गांधी क्रिडा संकुल राळेगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील गणमान्य नागरिक सहभागी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभाग, श्रीगुरूदेवसेवा मंडळ, धननिरंकार सत्संग, तालुका वकील संघ, जेष्ठ नागरिक मंडळ.मेडीकल असोसिएशन, व्यापारी बंधु ,तरूण बाल क्रिडा मंडळ पत्रकार बंधु यांचा उस्फूर्त सहयोग होता. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. हनुमान पोटफोडे यांनी त्यांच्या उपहारगृहात सर्व श्रमदात्यांसाठी चहापानाची सुंदर व्यवस्था केली