ढाणकीचा शेख इशराक शेख मुस्तफा यांच्या मेहनतीला यश, मोटार रिवायडींगचे काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा डॉक्टर होणार


नीट परीक्षेत घवघवीत यशाबद्दल बांधकाम सभापती नुरजहा बेगम शेख हुसेन यांच्या हस्ते अभिनंदन
नीट परीक्षेत 573 गुण मिळवून एम.बी.बी.एस प्रवेशास पात्र
ढाणकी – प्रति,प्रवीण जोशी
अतिशय अवघड समजली जाणारी वैद्यकीय क्षेत्रातील नीट परीक्षात पहिल्याच प्रयत्नात सर करून एम.बी.बी.एस डाॅक्टर बननण्याचे स्वप्न ढाणकीच्या शेख इशराक यांनी पूर्ण केले.काही दिवसांपूर्वी निट परीक्षेचा निकाल जाहिर झाला.यामध्ये ढाणकी मोटार रिवायडींगचे काम करून आपल्या मुलाला डाॅक्टर बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शेख मुस्तफा यांच्या मुलाने आकाशाला गवसणी घातली.
नांदेड येथील मोटेगावकर सर व चौगुले अकॅडमी शेख इशराकने आर.सी.सी व आय.आय बी या संस्थेमध्ये नीटचे क्लास केले होते.नीट परीक्षेचा निकाल हाती आला कठोर मेहनत व चिकाटी जिद्दीच्या या भरवशावर इशराकने अतिषय प्रतिकुल परीस्थीतीवर मात करीत 573 गुणांसह घवघवीत यष प्राप्त केले.इशराकची कुषाग्र बुध्दी आणि मेहनत बघुन मोटेगावकर आणि चौगुले सरांनी निःशुल्क सेवा दिली शीवाय इशराक अॅकॅडमीक कडूण स्काॅलर्षीप देवून त्याचा उत्साह व्दिगुणीत केला.इशराक ने 12 वी पर्यंत शिक्षण स्वामी विवेकानंद पब्लीक स्कुल ढाणकी येथे केले.
एका मुस्लीम गरीब कुटूंबात जन्मलेल्या इशराक ने वैद्यकीय सेवेत टाकलेला पहिले पाउल हे समाजासाठी अभिमानाची बाब आहे.अशी भावना ढाणकी न.प.च्या बांधकाम सभापती नुरजहाॅं बेगम शेख हुसेन यांनी त्यांच्या घरी जावून आई वडीलांसह पेढे भरूण कौतुक केले.व त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.