बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाची कार्यवाही; पोलिसात गुन्हा दाखल

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील सावनेर येथील बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य विभाग व पोलीस स्टेशन राळेगाव यांनी संयुक्त कार्यवाही केली आहे. शैक्षणिक पात्रता नसतानाही विविध आजारांवर उपचार करणाऱ्या एका बोगस बंगाली डॉक्टरवर तालुका आरोग्य विभागाने गुरूवारी (ता. १३) कारवाई केली. बोगस डॉक्टर व्यावसायिक शोध समितीने चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आले. डॉ. सुब्रता शंकर अधिकारी वय २६ वर्ष असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो राळेगाव तालुक्यातील सावनेर भागात रुग्णांवर उपचार करत होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोपाळ पाटील यांनी राळेगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद म्हणून तक्रार दिली त्यानुसार महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम कलम-३२(२), ३४, ३६ नुसार आरोपी बोगस डॉक्टर सुब्रता अधिकारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मोहन पाटिल करत आहे.