राळेगाव येथे नाफेड अतंर्गत चना खरेदीचे उद्घाटन

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव येथे दिनांक 14/3/2023 रोज मंगळवारला खरेदी विक्री संघाच्या वतीने नाफेड चना खरेदीचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी प्रथम शेतकरी सुलतान विष्णानी यांना सन्मानित करण्यात आले.त्यावेळी काॅंग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बाबाराव निमरड,काॅग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दिपक देशमुख, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मिलिंद इंगोले, नवनिर्वाचित संचालक मारोतराव पाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गोवर्धन वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंदराव चहांदकर ,खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक श्रीधर थुटुरकर सर, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक प्रशांत बहाळे, खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक पवन छोरीया, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक प्रविण झोटींग, नवनिर्वाचित संचालक अशोक काचोळे,नगरपंचायतीचे माजी नगरसेवक बंडू लोहकरे, सोबतच शेतकरी सुलतान विष्णानी,डायरे, गोविंदराव झाडे, मोरेश्वर डाखोरे, नवनिर्वाचित संचालक सचिन टोंग,कपिल खडसे, नवनिर्वाचित संचालक श्रावनसिंग वडते, प्रविण नरडवार, किशोर धामंदे,त्याचप्रमाणे सहायक निबंधक खटारे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावार, खरेदी विक्री संघाचे सचिव संजय जुमडे तसेच कर्मचारी सचिन बोरकर यांचेसह अनेक शेतकरी, कार्यकर्ते, कर्मचारी उपस्थित होते.