
वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी या गावांमध्ये अनेक वर्षापासून अवैध बनावट दारू विकत असल्याबाबतची तक्रार काही महिन्यापूर्वी वरोरा पोलीस स्टेशन येथे दिली होती. परंतू या कडे वरोरा पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.दि. 3 फेब्रुवारी रोज सोमवारला सकाळी साडेनऊच्या सुमारास गावातील महिलांनी अवैध दारू पकडली. याची माहिती पोलीस विभागाच्या 112 क्रमांकावर दिली. पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी हजर झाले. महिलांनी ती अवैध दारू पोलिसांच्या स्वाधीन केली.
काही महिन्यापूर्वी 2 ऑक्टोंबर गांधी जयंतीला कोरडा दिवस घोषित केला आहे, या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सरकार मार्फत सर्व दारू उत्पादन शुल्क यांना प्राप्त होते. तरीही या दिवशी महिलांनी अवैध दारु पकडून दिली. चिकनी या गावांमध्ये 40 वर्षा पासून अवैध दारू विक्री चालू असून अवैध दारू विक्रीवर पोलीस प्रशासन अंकुश लावण्यात सपशेल अपयशी झाले आहे. गावात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत! यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालतील का? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
