
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागल्याने शैक्षणिक कागदपत्रासाठी जुळवा जुळवा करून ऑनलाईन दाखले मिळवण्याकरिता सेतू केंद्रात विद्यार्थ्यांची झुंबड दिसून येत आहे मात्र वारंवार सर्वर डाऊन मुळे सेतू केंद्रात येणाऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागते त्यामुळे सर्व डाऊनचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी सेतू केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी केली जात आहे.
सध्या तालुक्यात पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका मोहीम राबविण्यात येत असून याकरिता शिधा कार्डधारकाकडून उत्पन्नाचे दाखले मागविले जात आहे त्याकरिता शिधापत्रिकाधारकानी उत्पनाच्या दाखल्याकरिता गर्दी केली आहे तसेच नुकत्याच लागलेल्या दहावी बारावीच्या निकालामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळावी त्यासाठी विद्यार्थ्यांची तसेच पालकांची लगबग वाढली आहे त्यामुळे सेतू केंद्रात मोठी गर्दी दिसून येत आहे.
दहावी बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विविध शासकीय कागदपत्राची आवश्यकता असते त्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू झाली आहे दहावी बारावीनंतर अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात तसेच वस्तीगृह शासकीय नोकरी शासकीय योजनांसाठी अर्ज करतात यासाठी जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला डोमेसिअल प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर रहिवासी दाखले आदी प्रमाणपत्राची आवश्यकता असते ही कागदपत्रे नसल्यास प्रवेशासाठी अडचण निर्माण होते त्यामुळे विद्यार्थ्यासह पालक कागदपत्राची जुळवाजुळ करताना दिसून येत आहे त्यातच शासनाने सेतू केंद्र संख्या वाढविल्याने शासकीय दाखले मिळणे सोपे झाले असले तरी सेतू केंद्रावर ऑनलाईन सर्वर डाऊन असल्याने दाखल्यांसाठी तासाने तास वाट पाहावी लागत आहे .
आम्ही नेहमी सेतू केंद्रात येणाऱ्या नागरिकांचे काम वेळेतच व्हावे त्यासाठी सतत काम करत असतो परंतु सर्व डाऊन मुळे दाखले देण्यास विलंब होत आहे सतत होणाऱ्या सर्वर डाऊन मुळे प्रमाणपत्र काढण्याला विलंब होत आहे त्यामुळे सेतू केंद्रात येणाऱ्या ग्राहकांना तासान तास वाट पाहावी लागत आहे तेव्हा सर्वर डाऊन चा प्रश्न त्वरित निकाली काढावा अशी मागणी सेतू केंद्रात येणाऱ्या नागरिकाकडून तसेच सेतू केंद्र चालकाकडून केली जात आहे.
सेतू केंद्र चालक
- गणेश काळे, सूरज भगत,सचिन त्रिपदवार
