
प्रवीण जोशी
ढाणकी.
ढानकीत सध्या नवरात्र उत्सव निमित्ताने विविध ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजिले आहे त्यानिमित्ताने स्थानिक बसवेश्वर स्वामी मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होता त्यावेळी सुरेश महाराज पवार बोलताना म्हणाले
आपण नियमितपणे विविध ठिकाणी आर्थिक व्यवहार करतो त्यात कुठे चढ-उतार होतानाच्या घटना निदर्शनास येतात. कधी आर्थिक बाजारात अचानक पणे उंच भरारी घेऊन पुन्हा तेवढ्या झपाट्याने निश्चयांकी होते. आर्थिक बाजारात मूल्याच्या किमतीत चढ-उतार या घटना घडत असतात यात कोणी प्रगती करतो तर कोणाची अधोगती होते.
तसेच काहीसे मानव जीवन जगताना खूप वेदना खाचखळगे, निराशा, अपयश, अनेकांच्या वाटेला येतात तेव्हा अत्यंत अवघड वेळ समोर असताना अचानकपणे घटना घडली म्हणजे त्या वेळेतून सुटका होते.पण वर्तमानात आलेल्या कठीण प्रसंगाला न डगमगता स्थिर राहून शांतपणे समोर जावे लागते. विश्वामध्ये असे कोणतेही संकट नाही की ज्यातून सुटका होऊ शकत नाही. वीर पुरुषाप्रमाणे त्यातून मार्ग काढणे अशा वेळी जो कोणी प्रसंगाला थरथरतो आयुष्यामध्ये अयशस्वी होतो तो चुकीच्या मार्गाने जातो, जीवनात अधोगती येते; चित्तात जीवन संपवायचा विचार येतात.
यावेळी महाराजांनी वेगवेगळे उदाहरणे जीवन पटलातील समस्याला व त्यात येणाऱ्या अडथळ्याला अनुसरून दिले ते पुढील प्रमाणे
एका सत्पुरुषाकडे एक तरुण गेला माझ्या जीवनात सारखे अडथळे येत असून मी माझ्या जीवना विषयी दुःखी आहे आर्थिक चन चन मोठी आहे व त्या युवकाला जीवनाचा थकवा आला असताना आयुष्य रुपी यात्रेला पूर्णविराम द्यावा असे विचार गोंगावत असताना माझे मार्गदर्शक व असे आव्हान केले तेव्हा सत्पुरुषाने त्या युवकाशी संवाद साधून त्याला आपल्या सोबत नेले. व तू करोडो रुपयाचा धनी असे सांगितले पण ते धन नेमके कोणते हे युवकाला समजेना युवक अवाक व चक्रावून गेला तुला लाखो रुपये मिळतील आर्थिक स्थिती उत्तम होईल असे किडनी लिव्हर हे शरीराचे महत्त्वपूर्ण अवयव दान देशील का त्या क्षणी सत्पुरुष म्हणाले मग डोळा, किडनि, दान का करत नाही यावर युवक म्हणाला ईश्वराने प्रदान केलेल्या अवयवावर माझा प्रपंच उदरनिर्वाह करू शकतो व आयुष्यात इतरांची मदत सुद्धा करत राहील मग एवढे सगळे असताना तू माझ्याकडे काहीच नाही असं का म्हणतो त्यावेळेस आपल्याकडे असलेल्या मौल्यवान अशा अवयवाची किंमत त्या तरुणाला कळली. सांगण्याचा मर्म असा की स्वतःला कधीही कमी समजू नका या आत्मरूपी देहामध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती वीस्फुरलेली आहे ती जागृत करण्यास समर्थता असावे . चांगले परोपकाराचे कामे करून जीवन सार्थकी लावावे असे सुद्धा महाराजांनी यावेळी सांगितले.
आपल्या आयुष्यात कल्पनेला महत्त्व आहे जशी आपल्या चित्तात कल्पना आहे त्याप्रमाणे घटना घडत असतात शेवटच्या क्षणी चांगली संकल्पना असेल तर पुढील भावार्थ उत्कृष्ट असेल अशी व्यक्ती चांगले योनीमध्ये जन्मेल.असे विविध उदाहरणे यावेळी महाराज कीर्तनात देऊन मानव जन्माचा मर्म समजावून सांगितला.
