
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर तालुक्यातील मौजे दुधड-वाळकेवाडी येथील आदिवासी आश्रम शाळा येथे दि ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गायकवाड दिघीकर व विजय वाठोरे सरसमकर यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छा देऊन सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी बोलताना चव्हाण सर यांनी सांगितले की शिक्षकांच्या समस्या जाणून त्या शासन दरबारी पोहचविण्याचे सामाजिक कार्य तुमि करत आहात हे पाहून मन भरून आले.समाजात तुमच्यासारखी माणसे क्वचितच आहेत.अश्याप्रकारे आमचा सत्कार करून शुभेच्छा दिल्यामुळे आमच्यासारख्या शिक्षकांना अजून जोमाने कार्य करण्यास ऊर्जा मिळते,प्रेरणा मिळते.यानंतर त्यांनी पत्रकार गंगाधर गायकवाड व विजय वाठोरे यांचे हृदयपूर्वक आभार ही मानले.यावेळी एस के चव्हाण सर,वाघमारे सर,राठोड सर,आगलावे सर यांच्यासह माध्यमिक शिक्षक,प्राथमिक शिक्षक तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
