गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे बाल लैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर सेमिनार चे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक 5/10/2024 रोजी गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे बाल लैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला समुपदेशक सौ.अर्चनाताई क्षिरसागर, ग्रामीण समस्या ट्रस्ट, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.विद्यार्थ्यांना गुड टच,बैड टच, लैंगिक अत्याचार, बालविवाह, छेडखानी, बलात्कार त्यांची कलमे व सजा यावर मार्गदर्शन करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना बोलके करुन त्यांच्या कडून माहिती जाणून घेण्यात आली.आणि सर्व विद्यार्थिनी ना सुचना करण्यात आली की तुमच्या बरोबर असा प्रकार जर घडला तर कोणाला सांगायचे आदि विविध विषयावर चर्चा करण्यात आली.