
प्रतिनिधी:प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी शहरामध्ये कमी विद्युत प्रवाहात सुद्धा लख प्रकाश देणारे हायमाईस्ट आहेत पण केवळ उंच खांब आणि त्यावर लाईट असूनही केवळ सुशोभित वस्तूच बनले आहेत व कानाने बहिरा मुक्का परी नाही अशी गत या लख प्रकाश देणाऱ्या लाईट कडे बघून वाटत आहे. कमी विद्युत मध्ये लख्ख प्रकाश देणाऱ्या अशा हायमाइस्ट लाईटची अशी अवस्था दुर्दैवाची बाब म्हणावा लागेल संबंधित प्रशासनाची गरज चलती का नाम गाडी एवढेच होते का असे सुद्धा सुज्ञ नागरिकांना वाटते आहे
ढाणकी शहरातील नगरपंचायत अंतर्गत निधीतून शहरात अनेक ठिकाणी मोठे हायमाईस्ट लाईट लावण्यात आले लावल्या नंतर लाईट फक्त काहिदिवस नियमित चालू होते मात्र गेल्या अनेक महीण्यापासून उपलब्ध असलेल्या एकही हायमाईस्ट लाईट चालू नाही हायमाईस्ट लाईट बंद असल्याबाबत नगरपंचायत प्रशासनानाने या बाबत सविस्तर माहिती घेऊन या अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लक्ष घालून जे काही तांत्रिक अडचण असेल ती दूर करून या अत्यंत ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देऊन तो निकाली काढायला पाहिजे नगरपंचायत ने हायमाईस्ट लाईट दुरस्ती कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे लाखो रुपये खर्च करून लावलेले हायमाईस्ट लाईट फक्त शोभेसाठी लावले का असा सुर जनतेतून एेकायला मिळत आहे येणाऱ्या काही दिवसातच अनेक सण महोत्सव ला सुरवात होईल त्या दृष्टीने हे लाईट दुरुस्ती होणे जरुरी आहे अनेक हायमाईस्ट लाईट बंद असल्यामुळे हजारो रुपये खर्च करून बसविलेल्या हायमाइस्ट लाईट च्या लख्खप्रकाशापासून शहरवाशी मुकत आहेत. हायमाईस्ट लाईट नगरपंचायत दुरस्ती करेल का? हे पाहणे गरजेचे आहे ज्या दिवशी सभापतीची निवड होती त्यादिवशी त्या समारंभाला अगदी कनिंग भर नेते होते त्या नेत्यांना ही बाब दिसत नाही म्हणजे आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.
