सराटी येथे भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

सराटी येथे महाभगवत सप्ताह आयोजित केला होता तथा या औचीत्याने श्री. ह.भ. प कवी गायक पांडुरंग शहारे महाराज लिखित “वृक्षगित माला” या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पूर्व विदर्भ वारकरी विभाग प्रमुख श्री.ह
भ.प. विवेक व्यास महाराज तथा अनेक साहित्यिक,ज्येष्ठ राजकीय,सामजिक बांधव यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती राळेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. अंकुशराव मुनेश्वर,मनोहर वासेकर,विलास भुजाडे, शेरअली बापू, दिगांबर तडस,पांडुरंग सोनावणे,मदन ठाकरे, विष्णूंजी गजबे,प्रतीक तोंद्वाल,स्वप्नील ठाकरे,गोविंद काकडे,मारोती सहारे,बबन उताणे इत्यादी मान्यवर उस्थितीत होते.