
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारा झाडगाव येथील रुपेश रेंघे यांच्या मालकीहक्काच्या भूखंडावर येण्याजाण्यासाठी असलेला रस्ता आजूबाजूच्या लोकांनी अडवून अतिक्रमण केले आणि त्यांचा रस्ता अडविला. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्राम प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे रुपेश रेंघे यांना दुसºयांदा ग्रामपंचायतला पत्रव्यवहार करून कुठलाही पर्याय निघाला नाही. यामुळे आता ते पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.
घरामध्ये येण्याजाण्यास अडचण निर्माण झाली आहे. या संबंधात ग्रामपंचायत झाडगाव, ग्रामपंचायत पंचायत समिती , यांना पत्र देऊन रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी केली. पण उपयोग झाला नाही. ग्राम पंचायत मोक्का समिती, तंटामुक्त ग्राम समिती यांनी मौक्यावर येऊन गैरअर्जदारांना रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिला. तस्या नोटीसाही दिल्या. पण रस्ता मोकळा करुन देत नाही. यामुळे मला आता उपोषणाचे पाऊल उचलावे लागत आहे. येत्या दिनांक. 2/1/2025 गुरुवारपासून मी पंचायत समिती राळेगाव येथे आमरण उपोषण करणार आहोत.
