दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार या न्यायालयाच्या आदेशामुळे ढाणकी येथील शिवसेनेमध्ये जल्लोष.


प्रती/प्रवीण जोशी
ढाणकी

…….


आवाज शिवसेनेचा जल्लोश पण शिवसेनेचाच
२१ तारखेला शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क वरील नाकारण्याच्या पालिका प्रशासनाविरोधात न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती. मुंबई पालिकेच्या आडमुठेपणा त्यांच्याच अंगलट येत न्यायालयाने पालिकेवर ताशेरे ओडले व आपण नियमांचे उल्लंघन केले अशी सक्त ताकीद दिली आतापर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. तर आताच कसा होईल अशी विचारणा न्यायालयाने पालिकेला विचारले व शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवाणगी दिली त्याचाच जल्लोष आज ढाणकीत शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा आनंद फटाके वाजवून साजरा करण्यात आला.