जिल्हा स्तरीय शालेय हॅन्डबॉल स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल ची गगनभरारी , विजेता संघ 17 वर्ष वयोगटातील शालेय मुलांचा हॅन्डबॉल संघ जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रथम स्थानी

=

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्हा स्तरीय 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या हॅन्डबॉल स्पर्धा नेहरू स्टेडियम येथे दिनांक 7 ऑक्टोबर रोजी पार पडली.यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा असणारे राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील 17 वर्ष वयोगटातील शालेय मुलांचा संघ झालेल्या अंतिम स्पर्धेत विजेता ठरला या संघात मध्ये
खेळाडू म्हणून युग गेडाम, धृप एन्गडे, नैतिक कोवे, भाविक घुडे, अनुज कोवे, अयान शेख, आयुष जुमनाके,देवाशू जुमनाके,प्रज्वल वाघाडे, लक्ष देशमुख, रोहित राऊत, आर्यन एम्बडवार, विशाल कोवे
या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राळेगाव तालुक्याचे नाव उज्वल केले तर वयोगट 17 वर्ष या गटात खेडाळू चे प्रशिक्षक म्हणून किशोर उईके, आनंद घुगे, सागर जुमनाके, नितीन सिडाम यांनी कार्य केले .विजेत्यांचे अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव चे अध्यक्ष बी. के. धर्मे,सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, व शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे , उपमुख्याध्यापक सुरेश कोवे पर्यवेक्षक सूचित बेहरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे…..