राळेगाव प्रधानमंत्री आवास योजना शहरी सरकारी जागेत राहणाऱ्या पात्र लाभार्थी कुटुंबाचे पाच वर्षात एकही घरकुलाचे बांधकाम नाही प्रधानमंत्री आवास संघर्ष समितीकडून धरणे आंदोलन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

केंद्र सरकारच्या गरजूंना घर देण्याच्या धोरणानुसार नगरपंचायत राळेगाव कडून सन 2017- 18 मध्येप्रकल्प एक व प्रकल्प दोन नुसार घरकुलाचे काम सुरू करण्यात आले होते प्रकल्प एक मध्ये 176 कुटुंबासाठी घरकुल सर्वसाधारणपणे मालकी घराची जागा असणारे लाभार्थी तर प्रकल्प दोन मध्ये 580 सरकारी जागेत वर्षानुवर्ष राहणारी लाभार्थी कुटुंबे प्रकल्प एक मधील 176 पैकी जवळपास 125 घरकुल प्रगतीत राहिले परंतु प्रकल्प दोन मधील 580 लाभार्थी कुटुंबांना नगरपंचायत शासनाकडून घर मोजणी सर्वेक्षण प्रमाणपत्र मालकी उतारे पट्टा उपलब्ध करून देणे गरजेचे होते परंतु अधिकारी वर्गातील हलगर्जीपणा व लोकप्रतिनिधी मधील अनस्तेमुळे या लाभार्थी कुटुंबांना सर्वेक्षण प्रमाणपत्र घरकुल पट्टा उपलब्ध करून दिला नसल्यामुळे आज तारखेत या लाभार्थी कुटुंबांना एकही घरकुल बांधता आले नाही लाभार्थी कुटुंबांच्या घराचे सर्वेक्षण करण्यासाठी संघर्ष समितीकडून अनेक पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते आता नगरपंचायत कडे 580 लाभार्थी कुटुंब व नगरपंचायत ला अलीकडेच प्राप्त झालेल्या 440 पात्र लाभार्थी कुटुंबाच्या घराचे सर्वेक्षण करणे व मालकी संबंधित शासनाचे प्रमाणपत्र लाभार्थी कुटुंबांना देणे आवश्यक आहे l नगरपंचायत च्या प्रकल्प दोन मधील 580 लाभार्थी कुटुंबाच्या घराची मोजणी तातडीने पूर्ण करावी व मोजणी झालेल्या लाभार्थी कुटुंबांना सर्वेक्षण प्रमाणपत्र पट्टा ताबडतोब उपलब्ध करून द्यावा प्रकल्प दोन शिवाय इतरही 440 पात्र लाभार्थी कुटुंबांच्या घराचे सर्वेक्षण करून त्या कुटुंबांना सर्वेक्षण प्रमाणपत्र मालकी संबंधीचे पट्टा विना विलंब उपलब्ध करून द्यावा व योजनेला गती द्यावी या न्याय हक्क मागणीसाठी प्रधानमंत्री आवास संघर्ष समिती व लाभार्थी कुटुंबाकडून दिनांक 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी दिनी नगरपंचायत समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे मुख्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात संघर्ष समितीकडून कळविण्यात आले आहे या निवेदनावर 260 लाभार्थी कुटुंबांच्या स्वाक्षरी आहेत या धरणे आंदोलनात प्रधानमंत्री आवास च्या सर्व लाभार्थी कुटुंबांनी सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष समितीचे सदस्य शंकर गायधने भानुदास वामन महाजन प्रभाकर धोटे दुर्गा वसंता कोदाने सीमा यडस्कर सुरेखा आत्राम पांडुरंग बोभाटे वनिता जुनगरे सुधाकर चंपत शिखरे अंकुश गेडाम प्रकाश कळमकर दीपा संजय कांबळे रंजना राजेंद्र कडू विजयसिंह ठाकूर रमेश शामराव कोहळे इत्यादींनी केले आहे