
- राजकीय पक्षाच्या व विविध संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर
संपूर्ण जगात लोककल्याणाची शासन व्यवस्था निर्माण करून प्रत्येक माणसाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हा विचार शिवाजी महाराजांनी पेरला महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज असून शिवाजी महाराजांबद्दल ब अवमान कारक बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन दिं.१३ मार्च २०२५ रोज गुरुवार ला राळेगाव तालुक्यातील राजकीय पक्षाच्या व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
नागपूर येथील रहिवासी असणारे प्रशांत कोरटकर या व्यक्तीने प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी दिली असताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व प्रभू राम यांच्या बद्दल अतिशय बेताल वक्तव्य केले. या संपूर्ण घटनेचे फोन रेकॉर्ड्स आजरोजी उपलब्ध आहे. प्रशांत कोरटकर हा महाराष्ट्रच्या सामाजिक आरोग्याला धोका पोहचवणारा व्यक्ती असून महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
या संपूर्ण महाराष्ट्रातील जनते मध्ये असंतोष पसरला असून सार्वजनिक शांतात व सुव्यवस्था भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न प्रशांत कोरटकर या व्यक्तीने केला आहे. कायद्याचे राज्य असताना अतिशय मस्ती मध्ये प्रशांत कोरटकर याने वक्तव्य केले आहे. कायद्या सुवस्था ही त्याच्या दावणीला बांधली आहे अश्या पद्धतीने तो वागत असून त्याला लगाम लावण्यासाठी कायदेशीर कार्यवाहीची गरज होती .
या पूर्वी सुद्धा अनेक लोकांनी महाराजांचा अपमान केला आहे त्यांच्या वर सुद्धा कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अश्या लोकांचा आत्मविश्वास वाढत असून सत्यत्याने महान व्यक्तींचा अपमान ही लोक करत असून अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या करिता राळेगाव विधानसभा क्षेत्रातील सर्वच राजकिय पक्ष व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
