
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाठोडा गावातील मतीमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला होता घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी किशोर सुखदेव शंभलकर(44) रा. पोहणा याने विनयभंग केला.राळेगाव पो. स्टे. ला या बाबत तक्रार 27 जून रोजी दाखल करण्यात आली, पीडित मुलीला हृदयाचा त्रास असून त्या दिवशी ती घरात एकटी होती. ही संधी साधून आरोपीने घृणास्पद कृत्य केले. सदर प्रकरणात 354,354A, 452,बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीला राळेगाव पोलीस स्टेशन याना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आज रोजी आरोपीला अटक करून पोलीस स्टेशन राळेगाव येथे आणण्यात आले.
