सहसंपादक : रामभाऊ भोयर
अमरावती बोर्ड कार्यालयाने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना ईतर शाळांमध्ये केंद्र संचालक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या नुकसानकारक असून हा एक प्रकारे शिक्षकांवरचा अविश्वास असून दहावी बारावी वर्गाच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना त्यांना सोडून दुसऱ्या शाळेवर पर्यवेक्षक म्हणून धावपळ करत जाण्याने आपल्या विद्यार्थ्यांना उर्वरित वेळ देणे शक्य नसून अशाप्रकारचा हा निर्णय ताबडतोब शासनाने रद्द करावा या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व समविचारी संघटना आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने येत्या 1 फेब्रुवारीला दुपारी 3ते4 या वेळेत अमरावती बोर्ड कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून या धरणे आंदोलनाला आपण सर्व उपस्थित राहून आपली मागणी यशस्वी करण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख, माजी विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे जिल्हा कार्याध्यक्ष आनंद मेश्राम विजय खरोडेइ जिल्हा सल्लागार अशफाक खान मनोज जिरापूरे जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते साहेबराव धात्रक शाम बोंडे मंगला वडतकर संजय पुरी श्रिकांत अंदुरकर गणेश धर्माळे जिल्हा सहकार्यवाह उमाकांत राठोड विठ्ठल परांडे गुलाब सोनोने संध्या जिरापूरे दिवाकर नरूले महेश अंदुरे उन्मेद डोंगरे कोषाध्यक्ष गंगाधर गेडाम जिल्हा संघटक भुपेंद्र देरकर संतोष हेडाऊ अरूण गारघाटे गजेंद्र काकडे पंकज राठोड महिला प्रतिनिधी वैशाली अरविंदराव चौधरी तथा समस्त आजिवन सदस्यांनी केले असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
