वणी तालुक्यातील बाबापुर गावातील शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या


वणी..प्रतिनिधी नितेश ताजणे


वणी तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असतानाच आता आणखी एका शेतकऱ्याने विषाचा घोट घेतल्याची घटना तालुक्यातील बाबापुर येथे दि.२० जुलै ला सायंकाळी घडली.किशोर शामराव येरगुडे (४०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. किशोर यांचे नावे मौजे बाबापुर येथे शेतजमीन असुन ते शेती व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. दिनांक २० जुलै रोजी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास किशोर ने विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना तात्काळ वणी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. किशोर ने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.

त्याच्या कुटुंबात पत्नी सुनंदा किशोर पेरगुडे (३५), मुलगा अजय किशोर येरगुडे(१९), मुलगी शुभांगी किशोर येरगुडे (१७) व आई कमल शामराव येरगुडे( ६५) असा परिवार आहे.
पुढील तपास पोलीस करत आहे.