
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून भावना गवळी यांना डावलण्याचे कोणतेही कारण नव्हते. कट कारस्थान करून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तिकडे हेमंत पाटील यांना ही उमेदवाऱी पासून वंचीत ठेवण्यात आले. राजश्री पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. त्यांना निवडून आणण्याचे आस्वासण देण्यात येऊन ज्यांनी प्रचार सूत्र हातात घेतले त्यांनीच त्यांच्या पैसा लुटला व ताई चे कामं केले नाही अशी आता चर्चा रंगु लागली आहे. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर चर्चाचा फड रंगु लागला आहे. राळेगाव विधानसभा मतदार संघात अपेक्षेनुरूप मतांची टक्केवारी अधिक राहील हा अंदाज होता, तो खरा ठरला. या उपर देखील याच मतदारसंघातुन एकतर्फी बहुमत मिळेल आणि ते उमेदवाराच्या विजयाकरीता निर्णायक राहील असा देखील राजकीय जानकारांचा पुढचा अंदाज आहे.विजय -पराजयाच्या चर्चेला एक अधिकची किनार आहे ती, ताई व भाऊ च्या रकमेवर कुणी -कुणी किती डल्ला मारला याची. स्वतः च उखळ पांढरं करून घेणाऱ्या ची यादीच बाहेर येऊ लागली आहे.
यातील भाऊने फारसा खिसा खाली केल्याचा कुणाला विश्वास नाही. भाऊ घाटा-घाटाच पाणी पिऊन मैदानात उतरलेला, त्याला एकवेळ जनता माझ्यासोबत आहे हा अंदाज आला अन त्यानं हात आखडता घेतला. ‘करानं तर करा नाहीतर नका करू प्रचार ‘असं सुनावण्यास भाऊ कमी पडला नाही. तर अनेकांना शेवटपर्यंत झुलवत शेवटी चाट दिली आणि मूळचा स्वभाव कायम असल्याची जाणीव नव्याने अनेकांना झाली. थोडक्यात लोकसभा लढता येते आणि कदाचित पुढे चालून जिंकताही येते असा एक नवा परिपाठ राजकीय क्षेत्राला भाऊ शिकवनार का हे जून महिन्यात कळेल.
भाऊची ही तऱ्हा दिसली मात्र खरी लूट झाली ती ताईच्या रसद ची. वेळेवरची तयारी,अनोळखा मतदार संघ,त्यात सहा मोठे डाकू त्यांना आपल्या -आपल्या विधानसभा मतदार संघाची काळजी, त्यांचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार होऊ इच्छिणारे चेले -चपाटे त्यांना जि. प. व प. स. निवडणुकांच्या खर्चाची चिंता, काही जणांना ही संधी येणार नाही हात धुऊन घ्या असा साक्षात्कार झालेला आणि या सर्वांची एकत्रित परिनीती झाली ती हपापाचा माल गपापा करण्यात. भरमसाठ पैस जिथंच्या तिथं दबला.गडप झाला. राळेगाव विधानसभा मतदार संघातील अनेक बूथ वर ताई चा माणूस नव्हता आणि होता तर त्याने हात हलवण्यापेक्षा अधीक काहीच केले नाही. ताईच्या टीम ला पद्धतशीर गुमराह करून अनेकांनी कवडीचे कामं केले नाही हे ग्राउंड लेव्हल वर दिसलें.
या सोबतच जे बदल करू शकतात, ज्यांना काही एक दिशा कळते. माणूस कळतो गावं समजतो अशी माणसं पद्धतशीर दूर ठेवण्यात आली याचा फटका देखील ताईला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सारी यंत्रणा असतांना चुकीच्या लोकांच्या हाती धुरा सोपवल्याच्या चर्चा आणि किस्से आता बाहेर पडू लागले आहे.
निकालाचा परिणाम विधानसभा उमेदवारीवर
‘ पार्टी विथ डिफरन्स ‘ हा एकेकाळचा भाजपा चा लौकिक आता बऱ्यापैकी पुसट झाला. भाजपाच्या ‘ इंनकमिंग ‘ने हा डिफरन्स कमी केला. मात्र धाडसी निर्णय घेण्याची पद्धत या पक्षाने बदललेली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपा वा मित्र पक्षाच्या उमेदवाराला लीड मिळाली नाही तर त्या क्षेत्रातील आमदाराला तिकीट दयायची की नाही यावर निर्णय होणार आहे. महायुतीचा उमेदवार पंधरा हजार मतांनी पिछाडीवर राहिला तर बहुसंख्य आमदारांना घऱी बसवण्यात येण्याची चर्चा भाजपा वर्तुळात आहे. अशा वेळी ताई च्या पैसतुन हपापा करण्याची किमत किती मोठी मोजावी लागेल याचा विचार कोण करणार.
