सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 1डिसेंबर रोजी ईश्वर नगर भोसा रोड यवतमाळ येथे भारतीय अर्ध सैनिक बल माजी सैनिक कल्याण संघटनाच्या वतीने सीमा सुरक्षा बल 60 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष माजी सैनिक हवालदार सुभाष यादव साहेब ह्यांनी केले. प्रमुख उपस्थिती माजी सैनिक सुभेदार आत्राम साहेब व प्रमोद जगताप साहेब आणि उप निरीक्षक कृष्णा बनारशे साहेब. संघटनेचे अध्यक्ष जगत चव्हाण व उपस्थीत पाहुण्याचे हस्ते दीप प्रज्वलन करून व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली..
सूत्रसंचालन व मान्यवरांचे स्वागत संघटनेच्या सर्व सदस्यच्या वतीने करण्यात आले.. कार्यक्रमाच्या मध्यांतरित विशेष अतिथी म्हणून ज्यांची सर्व सभा आतुरतेने वाट बघत होती ते कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती व सत्कारकर्ते नवंनिर्वाचित मान. श्री बाळासाहेब मांगुळकर साहेब आमदार यवतमाळ विधान सभा ह्यांचे आगमनाने कार्यक्रमाला चार चाँद लावले.. सर्व प्रथम महापुरुषांना पुष्पहार अर्पण करुन विशेष अतिथी आमदार साहेबांनी आपले स्थान ग्रहण केले. तदनंतर संघटनेचा वतीने विधानंसभा यवतमाळ निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर विशेष अतिथी लाभलेले मनमुक्त स्वभावाचे आदरणीय श्री बाळासाहेब ह्यांचे हस्ते भारतीय सीमेवर तैनात आपले आयुष्य वेचणाऱ्या BSF शहीद जवानांच्या वीरांगना चारूताई शिरसागर दिग्रस निवासी नंतर शहीद वीरांगना मीनाताई वावरे मुलकी निवासी आणि वीरांगना मडावी ताई ह्यां सर्वांचा सन्मान सत्कार आमदार बाळासाहेबांच्या हस्ते करण्यात आला..
विशेष अतिथीने आपले मोलाचे मार्गदर्शन व शहिदांच्या परिवाराला आदराचा व मानाचा मुजरा शब्दशा संबोधित करुन कृतज्ञता व्यक्त केली.. देशाच्या सीमेवर आयुष्य वेचणाऱ्या सैनिकांप्रती मला अभीमान आहेच पणं आज इथे त्यांच्या परिवारात सामील होवून मला कर्तव्यदक्ष व निष्ठावान सैनिक परिवारास भेटून गौरवांच्छित, प्रसन्न वाटतं आहे.
मी माझ्या परीने जे काही सहायता, सेवा, मदत , कीव्हा एक लोक प्रतिनिधी म्हणून सहकार्य नक्कीच प्रदान करू असे आश्वासन ह्या 60व्या सीमा सुरक्षा बल स्थापना दिवसाच्या सोहळ्यात त्यांनी व्यक्त केले.. आणि सर्व सैनिक परिवाराचे आभार व्यक्त करून सर्वांना 60 व्या BSF वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आणि सदैव असेच कार्यक्रम घेतं रहा आम्हीं खंभीर पने आपल्या पाठीशी आहोच कधी पणं आवाज द्या नक्की मदत मिळेल असे आश्वासन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले..
समस्त कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार संघटनेचे कार्याध्यक्ष मेजर जीवन कोवे ह्यांनी मानते.