
MH 29 हेल्पिंग हँड अँड वाईल्ड ॲडव्हेंचर मुकुटबन च्या सर्प मित्रांकडून 4.6 फूट मांडूळ साप याला जीवनदान
मुकुटबन येथील बेघर नगरीत काल दि. २१/०५/२०२३ रात्री १२:३० वा. प्रवीण चिटलावार यांचे घरात साप निदर्शनास आल्यास वेळेचे भान ठेऊन प्रवीण चिटलावार यांनी सर्प मित्र संतोष गुम्मुलवार व संदीप भाऊ धोटे यांना कॉल करून तात्काळ घरी बोलावून घेतलं असता तेथे मांडूळ जातीचा साप असून लांबी 4.6 फूट होता आढळून आला त्या ठिकाणी सर्प मित्र संतोष भाऊ गुम्मुलवार व संदीप भाऊ धोटे यांनी मिळून या सापाला कुठलीही इजा न होऊ देता बड्या शीताफिने पकडून याला वन रक्षक श्री कुणाल सावरकर यांच्या सहकार्यांनी वन विभाग बिट ३४ मध्ये सुरक्षित सोडण्यात आले.
अंधश्रद्धेमुळे दिवसेंदिवस मांडूळ या सापाची प्रजाती कमी होत चाललेली आहे.
