
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे सरपंच उमेश भाऊ गौरकार यांच्या अध्यक्षतेखाली २९ आगस्ट रोजी समाज मंदिर मध्ये ग्राम सभा घेण्यात आली होती सदर या सभेला शेकडो पुरुष, महीला व गावातील युवक उपस्थितीत होते तर या ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी भानुदास आडे यांची अविरोध निवड करण्यात आली तर पतीच्या निधनानंतर पत्नीच्या बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे ही कुप्रथा बंद करणे असा प्रस्ताव सरपंच उमेश गौऊळकार यांनी ग्रामसभेत गावकऱ्यांन समोर मांडला असता याला समस्त गावकऱ्यांनी होकार दिला व सरपंच उमेश गौऊळकार यांनी घेतलेल्या निर्णयांचे टाळ्या वाजवून स्वागत केले तर गावातील सुरेश श्रीहरी सातघरे वय २८ वर्ष या एका गरीब युवकांनी खाजगी कर्जा पाई विष प्राशन करून आत्महत्या केली होती सदर असे करणे चुकीचे आहे.सुरेशच्या निधनाने सातघरे परिवारावर मोठा दुखःचा डोंगर कोसळला आहे.गावातील असे काही कुणा गरिब व्यक्ती वर संकट आल्यास त्यांनी आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घेऊ नये काही अडचण आल्यास त्यांनी मला सांगितले तर मी त्यांना नक्कीच मदत करणार असे सरपंच उमेश गौऊळकार यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांना सांगितले आहे.सदर ग्रामसभेत प्लास्टिक मुक्त गाव करणे,रस्त्यावर बैल किंवा बैल बंडी ठेवणे हे बंधनकारक राहील तसेच गावातील गर्जु लोकांनाच घरकुलाचा लाभ देण्यात येईल असे सरपंच यांनी सांगितले आहे गावातील अनेक समस्या बाबत युवकांनी प्रसन्न उपस्थितीत केले होते या संपूर्ण प्रसन्नाची उत्तरे सरपंच उमेश गौऊळकार यांनी ग्रामसभेत दिली असल्याने गावकऱ्यांनी समाधानी व्यक्त केले आहे सदर ग्रामसभेला सभेचे अध्यक्ष सरपंच उमेश गौऊळकार, सचिव विना राऊत, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील ढगेश्वर मांदाडे, मुख्याध्यापक आर के सुखदेवे, तलाठी बावनकुळे, कोतवाल दिपक खीरखकर, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील पुरुष, महिला व युवा या ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
