पोलीस स्टेशन वडकी तर्फे जनजागृती मोहिमेला सुरुवात,तरुणांना द्वेषपूर्ण माहिती ,व्हिडिओ न पसरवता शांतता ठेवण्याचे आवाहन

पोलीस स्टेशन वडकी हद्दीतील ग्राम वडकी, वाढोना बाजार, खैरी गावातील लोकांमध्ये सोशल मीडिया बाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सोशल मीडिया जसे व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर याद्वारे धार्मिक भावना भडकविणारे किंवा समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारची आक्षेपार्य माहिती जसे फोटो, व्हिडीओ, मेसेज शेअर करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. अशी माहिती फॉरवर्ड केल्यास गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे ज्या मध्ये जामीन मिळणार नाही असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही माहिती शेयर करतांना काळजी घ्यावी. याबाबत पोलीस स्टेशन हद्दीत लोकांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आक्षेपार्ह माहिती प्रसारित न करण्याबाबत जनतेचा वावर असलेल्या दर्शनीय भागात बॅनर व वाहनावर पाॅम्प्लेट लावले व नागरिकांना पॉम्प्लेट देऊन जनजागृती करण्यात आली. सदरची जनजागृती मा श्री पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा श्री पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा श्री प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात ठाणेदार विजय महाले व अंमलदार यांनी केली.