सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाठोडा येथील दत्ता नवघरे वय ५२ वर्ष व उमेश हरणे वय २६ वर्ष हे दोघेही राळेगाव येथे घरकुलच्या कामाकरिता पंचायत समिती येथे आले असता ते काम आटोपून सायंकाळी गावाकडे वाठोडा येथे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात कंटेनर ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने उमेश हरणे त्यांच्या डोक्याला जब्बर मार लागल्याने उमेश हरणे याला यवतमाळ येथे उपचाराकरिता नेत असताना वाटेतच मृत्यू झाला तर दत्ता मधुकर नवघरे हे किरकोळ जखम झाल्याची घटना दिं. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सावंगी रोडवर जिओ पेट्रोल पंप जवळ घडली आहे. दत्त मधुकर नवघरे व उमेश सुरेश हरणे हे दोघेही वाठोडा वरून राळेगाव येथे एम एच २९ ए एक्स ८६२२ होंडा शाइनया दुचाकीने घरकुलच्या कागदपत्राची विचारपुस करण्याबाबत पंचायत समिती येथे आले होते त्यानंतर राळेगाव येथील काम आटोपून सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान वाठोडा येथे गावाकडे जात असताना ते जिओ पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकले व पंपवरून गावाकडे जात असताना सावंगी पेरका रोडने जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात कंटेनर ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने उमेश हरणे गंभीर जखमी झाला तर दत्ता नवघरे किरकोळ जखमी झाले असून या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना यवतमाळ ते उपचाराकरिता पाठविण्यात आले असता डॉक्टरांनी उमेश हरणे याला वृत्त घोषित केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश दंदे यांच्या मार्गदर्शनात राळेगाव पोलीस करीत आहे.
