ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड काढण्याच्या कामांना काही दिवसांपासून स्थगिती.वेबसाईट ठरत आहे कुचकामी



प्रतिनिधी ::प्रवीण जोशी
यवतमाळ


देशात मतदान कार्ड एक विशिष्ट ओळख आहे पूर्वीच्या काळापासून मतदान दस्त हे देशातील नागरिकांचे एक अत्यंत महत्वपूर्ण आणी विशिष्ट दर्जाचे ओळखपत्र आहे.मतदान करण्यासह कर्ज,मालमत्ता व शासकीय,खाजगी आणी इतर कामातही अत्यंत उपयोगी ठरत आहे.परंतु दिवसेंदिवस देशाची प्रगती पाहता मतदान कार्डसह आधार कार्ड ची देखील निर्मिती झाली.परंतु आधार कार्ड व पॅन कार्डसह मतदान कार्ड चे देखील व्यक्तिगत कर्ज , सामूहिक कर्ज,शासकीय, निमशासकीय व खाजगी योजनेत आजही महत्व कायम आहे.परंतु गेल्या आठ दिवसांपासून मतदान कार्ड ची कामे गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याची माहिती एका केंद्र चालकाने लोकहितशी बोलताना दिली आहे.नवीन मतदान कार्ड बनवीने,जुने मतदानकार्ड नवीन बनवीणे नावात दुरुस्ती करणे अशा कामांना गेल्या आठ दिवसांपासून स्थगिती आहे.नवीन कार्ड अथवा नावात दुरुस्ती सारखी कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांच्या महत्वपूर्ण कामाचा खोळंबा होत असल्याची माहिती समोर येत आहे.