
ढाणकी -प्रतिनिधी:प्रवीण जोशी
स्थानिक गोदावरी अर्बन बॅंकेच्या दुसऱ्या वर्धापन दिना निमित्त पंचायत समिती उमरखेडच्या वतीने आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार प्राप्त झाल्याच्या निमित्ताने गोदावरी अर्बन बॅंकेच्या गोदावरी अर्बन फाऊंडेशन महिला सदस्यांच्या हस्ते सुनिता लुटे तसेच 17 महिला ंना विविध क्षेत्रात केलेल्या चांगल्या कार्याचा गौरव म्हणून बॅंकेने भेट वस्तु व पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले.इतर महिलांनी रक्तदान शीबीरात आयोजीत कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता.
नुकत्याच तालुका स्तरीय आदर्श शीक्षक पुरस्कार सोहळयाचे उमरखेडला आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये कर्तृत्ववान शीक्षकांचा सत्कार करण्यात आला होता.त्यामुळे गोदावरी अर्बन पतसंस्थेच्या सभासद या नात्याने बॅंकेने सुध्दा त्यांचा सत्कार करण्याचे आयोजीत केले होते.या आयोजन सोहळयामध्ये बॅंकेचे कर्मचारी शाखा व्यवस्थापक मुकुल पांडे,संतोश निरगुडे,श्रीनिवास पाध्ये,अभिजीत मिडेपील्लेवार,मनिशा देशमुख,संकेत साखरे,ज्ञानेश्वर नाईकवाडे,संदेश गायकवाड इत्यादी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
या सत्कार सोहळयामुळे मला अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रीया आदर्ष शीक्षक पुरस्कार प्राप्त एस.बी.लुटे यांनी व्यक्त केली.
