
सहसंपादक: रामभाऊ भोयर
रावेरी येथील सुरज भाऊराव घोटेकर वय २४ वर्ष व यश मोरेश्वर ठाकरे वय २३ वर्ष राहणार टिपू सुलतान चौक यवतमाळ हे दोघेही दिं १७ फेब्रुवारी २०२३ रोज शनिवारला दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान रावेरी येथून कापशी यात्रेला गेले असता यात्रा आटोपून सायंकाळी ७:०० वाजताच्या दरम्यान रावेरी कडे येत असताना वालूधूर फाट्याजवळ राळेगाव कडून भरधाव वेगात येणाऱ्या क्रूझर गाडीने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने यश ठाकरे हा जागीच ठार झाला तर सुरज घोटेकार गंभीर जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की यश मोरेश्वर ठाकरे राहणार टिपू सुलतान चौक यवतमाळ हा आपल्या काकाकडे रावेरी येथील राजेश ठाकरे यांच्याकडे दिं १६ फेब्रुवारी २०२४ शुक्रवारला पाहुनपणासाठी आला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी यश मोरेश्वर ठाकरे व रावेरी येथील त्याचाच मित्र सुरज भाऊराव घोटेकर हे दोघेही दुपारी ३:०० वाजता च्या दरम्यान यश च्या काकाची मोटर सायकल क्रमांक एम एच २९ बी एल ८४४३ या मोटरसायकलने यात्रेकरिता कापशी येथे गेले त्यानंतर यात्रा आटोपून रावेरी कडे येत असताना सायंकाळी ७:०० वाजताच्या दरम्यान वालधूर फाट्याजवळ राळेगांव कडून येणाऱ्या एम एच २९ ए आर २५५८ या क्रमांकाच्या समोरून येणाऱ्या भरधाव क्रूझर गाडीने दुचाकीला जबर धडक दिली या धडकेत यश मोरेश्वर ठाकरे हा जागीच ठार झाला तर सुरज घोटेकर हा गंभीर जखमी झाला असून सुरज घोटेकार याला यवतमाळ येथे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सदर क्रुझर वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
