
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगांव खरीप हंगाम पूर्वतयारी म्हणून राळेगाव तालुक्यातील सर्व निविष्ठा विक्रेते वितरक साठवणूक केंद्र धारक पुरवठा उत्पादक प्रतिनिधी यांची सभा दिनांक दिनांक-१७/०५/२०२४ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय खरीप पूर्व हंगाम आढावा सभा प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तहसील राळेगाव येथे आयोजित करण्यात आली होती.
कायद्याचे ज्ञान अवगत करण्याच्या दृष्टीने तहसीलदार मा. अमित भोईटे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व सभेचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. जगन राठोड उपविभागीय कृषी अधिकारी यवतमाळ हे प्रामुख्याने उपस्थित होते, तर प्रवीण जाधव,मोहीम अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, कल्याण पाटील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यवतमाळ व श्रीमती मनीषा पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक व बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
या खरीप पूर्व हंगाम सभेचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी केले असून खरीप हंगामाच्या अनुषंगाने नियोजनाबाबत सभागृहाला माहिती दिली यामध्ये सन सन२०२४-२५ खरीप हंगामामध्ये साधारणतः ५९५०० हेक्टर क्षेत्र वर पेरणी होण्याची शक्यता असून यामध्ये प्राधान्याने कापूस हे प्रमुख पीक म्हणून साधारणता ४४५०० हेक्टर वर लागवड होण्याची शक्यता आहे त सोयाबीन त्यासाठी लागणारे बियाणे साधारणतः६८००ते ७००० हेक्टर क्षेत्रावर, व तूर ६५०० ते ७००० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. यासाठी कपाशीचे २ लाख पॅकेट, तुरीचे ९५० क्विंटल व सोयाबीनचे घरचे राखीव बियाणे व बियाणे बदलानुसार ७००० क्विंटल बियाणे याची आवश्यकता असून त्या प्रमाणात बियाणे उपलब्ध होईल याचप्रमाणे खताचे देखील मुबलक प्रमाणात उपलब्धता गरजे नुसार करण्यात येईल याचप्रमाणे सन २०२४-२५ मध्ये कृषी विभागाचे विविध योजना जसे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवड योजना बीज प्रक्रिया रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी उगवण क्षमता चाचणी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग माती नमुने तपासणी वैयक्तिक शेततळे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड राष्ट्रीय खाद्यतेला अभियान याबाबत सविस्तर माहिती देऊन उपस्थित त्यांना कृषी विभागाच्या विविध योजनां चा लाभ घेणेबाबत आवाहन करण्यात आले यानंतर श्रीमती मनीषा पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी खरीप हंगाम यामध्ये कृषी निविष्ठा पुरवठादार यांनी शेतकऱ्यांना खते बियाणे व कीटकनाशके याबाबत विक्री करताना घ्यावयाची काळजी विविध नियम व आदेश याचे पालन करून माफक दरात सर्व निविष्ठा उपलब्ध करून देण्याबाबत सुचित केले यानंतर माननीय उपविभागीय कृषी अधिकारी यांनी कृषी विभागामार्फत खरीप हंगामात राबविण्यात येणाऱ्या २७ मुद्द्यांची माहिती सभागृहाला दिली यामध्ये बियाणे उगवण क्षमता चाचणी बीज प्रक्रिया , रुंद सरी वरंबा यावरील लागवड पद्धत, क्रॉपसॅप, गुलाबी बोंड आळी नियंत्रण सुरक्षित फवारणी ठिबक सिंचनाचा वापर करून कापसाचे उत्पादन घेणे दर्जेदार निवेष्ठापुरवठा बाबत सभागृहाला सविस्तर मार्गदर्शन केले तसेच यावेळी जिल्हास्तरावरून उपस्थित झालेले मार्गदर्शक कल्याण पाटील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी निवेष्ठापुरवठादारांना बियाणे खते व औषधे या संदर्भातील विविध कायदे व आदेश याबाबत माहिती दिली व त्यातील तरतुदी याबाबत जाणीव करून दिली तसेच साथी २ या मोबाईल प्रणाली बाबत ऑनलाइन प्रात्यक्षिक करून दाखविले, यावेळी निविष्ठापुरवठादारांपैकी श्री लालानी यांनी सर्व निवेष्ठापुरवठा दारांतर्फे खरीप हंगामात शेतकऱ्यांना माफक दरात दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत ग्वाही दिली .यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित भोईटे तहसीलदार राळेगाव यांनी सभागृहाला शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य व माफक दरात उपलब्ध करून देणे बाबत सूचित केले तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवणे बाबत मदत करण्याचे आवाहन केले . निविष्ठा विक्री करताना सर्व नियमांचे पालन करणे बाबत सर्व सेवा पुरवठादार व निविष्ठा पुरवठा दरांना सूचित केले खरीप हंगामासाठी शेतकरी बांधव व निगडित विभागांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार कृषी पर्यवेक्षक राळेगाव राळेगाव यांनी केले या कार्यक्रमासाठी कृषी विभागातील धांडे मंडळ कृषी अधिकारी शिरभाते , निस्ताने व सर्व कृषी सहाय्यक यांनी विशेष प्रयत्न केले
