कोषटवार शाळेत विज्ञान दिन साजरा


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी.

पुसद/कोषटवार दौलतखान विद्यालय पुसद येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने वर्ग ८ च्या विद्यार्थ्यांनी डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या संशोधन कार्यावर आधारित लेख तसेच विज्ञानावर आधारित कविता वैज्ञानिक संकल्प ना यांचे सादरीकरण करण्यात आले .याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धनवे, उपमुख्याध्यापक वायकुळे सर ,पर्यवेक्षक रायपूरकर महाजन कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख अर्चना हरीमकर मॅडम उपस्थित होत्या . मार्गदर्शन मीनाक्षी खंदारे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन
रिया रोकडे हिने केले . याप्रसंगी
डॉ.चंद्रशेखर वेंकटरमन यांच्या “रमण इफेक्ट्स “या संशोधन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला .या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे